प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील पारंपारिक फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:29 IST2025-04-01T16:19:57+5:302025-04-01T16:29:10+5:30

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते.

सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे लुक शेअर करते.

मॉर्डन लुक असो किंवा पारंपारिक लुक असो प्रत्येक लुकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. कोणतीही फॅशन ती अगदी सहजपणे कॅरी करते.

आताही प्राजक्ताच्या पारंपारिक फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधलं.

प्राजक्तानं लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

यावर तिनं तिच्या 'प्राजक्तराज'चे पारंपारिक दागिने परिधान (Traditional Jewellery) केले आहेत.

तिच्या लेटेस्ट फोटोंवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

दरम्यान प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तिचा फुलवंती हा चित्रपट २०२४ मध्ये रीलीज झाला होता.

तसेच काही दिवसांपूर्वीच तिचा 'चिकी चिकी बूबूम बूम' हा सिनेमा रिलीज झाला होता. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं.