पूजा सावंतचा ग्रँड विवाहसोहळा, Photos पाहून नेटकरी म्हणाले, 'मन धागा धागा जोडते नवा!'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:22 PM2024-02-29T12:22:27+5:302024-02-29T12:33:00+5:30

पूजा सावंतच्या लग्नाचे 'कलरफुल' Photos

मराठी सिनेसृष्टीत काल एक ग्रँड विवाहसोहळा पार पडला. तो म्हणजे सगळ्यांची लाडकी पूजा सावंतचा. पूजा सावंतने (Pooja Sawant) काल मुंबईत सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavhan) आयुष्यभराची गाठ बांधली.

पूजा आणि सिद्धेशच्या वेडिंग फंक्शन्सला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली होती. तिच्या मेहंदी, हळद, संगीतचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये पूजा आणि सिद्धेश या कपलने खूप धमाल केली. तसंच मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या आनंदात सहभागी होती.

काल २८ फेब्रुवारी रोजी पूजा आणि सिद्धेशने साताजन्माची गाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो कधी येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर पूजाने तिच्या लग्नाचा वेडिंग अल्बमच पोस्ट केला आहे. त्यांचं लग्न एखाद्या ड्रीम वेडिंगपेक्षा कमी नाही असंच या फोटोंमधून दिसत आहे.

पिवळी नऊवारी, हातात हिरव्या बांगड्या, डोईला मुंडावळ्या, साजेसे दागिने या नव्या नवरीच्या लूकमध्ये पूजाचं सौंदर्य खुलून आलं आहे. नव्या नवरीचा लग्नातील थाट अगदी पाहण्यासारखा आहे.

तर दुसरीकडे सिद्धेश फिक्या गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे. गळ्यात माळ आणि डोक्यावर फेटा बांधून त्याने लूक पूर्ण केला आहे. उपस्थित पाहुण्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केल्याचंही दिसत आहे. फुलांमध्ये दोघंही न्हाऊन निघाले आहेत.

दोघांचीही जोडी अगदी शोभून दिसत आहे. फुलांची सजावट असलेल्या मंडपात त्यांनी सातफेरे घेतले. यावेळी आजबाजूचं वातावरणही गुलाबी झाल्याचं दिसत आहे. पूजा सिद्धेशचे फोटो सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाले आहेत.

दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगून जात आहे. त्यांच्या आनंदात कुटुंबीय, नातेवाईक मित्रपरिवारही सहभागी झाले आहेत.

पूजा आणि सिद्धेशच्या लग्न आणि रिसेप्शन पार्टीत अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, सचिन पिळगांवकर, अंकुश चौधरी सह अनेक कलाकार लग्नसोहळ्याला आले होते.

पूजाच्या आयुष्यातला मिस्ट्री मॅन कोण हे समोर आलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सिद्धेशचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. तो ऑस्ट्रेलियतील एका कंपनीत आहे. आता पूजाही तिकडे शिफ्ट होणार असून कामानिमित्त भारतात ये जा करणार आहे.

सिद्धेश आणि पूजाला कुटुंबीय, कलाकार आणि चाहत्यांनी भरभरुन आशीर्वाद दिले आहेत. सौजन्य- Pooja Sawant Instagram