मृण्मयी देशपांडेचा स्टायलिश अंदाज; तिच्या Waves Hemp ब्लेझरची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 17:19 IST2023-10-10T17:14:34+5:302023-10-10T17:19:09+5:30

मृण्मयी देशपांडे: अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. ज्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. गेल्या बऱ्याच काळापासून मृण्मयी कलाविश्वात सक्रीय आहे.

मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी मृण्मयी आता या सिनेसृष्टीत चांगलीच रमली आहे.

मृण्मयीने मालिका, सिनेमा, रिअॅलिटी शो यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

मृण्मयीने मालिका, सिनेमा, रिअॅलिटी शो यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

मृण्मयी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक दिग्दर्शिका आणि यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे.

मृण्मयी लवकरच मुंबई डायरी या सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती प्रमोशनमध्ये बिझी आहे.

या सीरिजच्या निमित्ताने तिने एक फोटोशूट केलं. या फोटोमध्ये ती स्टायलिश अंदाजात दिसून येत आहे.

मृण्मयीने Waves Hemp ब्लेझर आणि त्यावर पँट परिधान केली आहे. तिचा हा लूक आणि खासकरुन तिचं हे ब्लेझर जास्त चर्चेत येत आहे.