मराठमोळ्या मीरा जोशीच्या नव्या फोटोशूटने उडवली सर्वांची झोप, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 08:00 IST2020-05-31T08:00:00+5:302020-05-31T08:00:00+5:30
मराठी अभिनेत्री मीरा जोशीच्या नव्या फोटोशूटची सगळीकडे खूप चर्चा होते आहे.

मीरा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मीरा फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत पहायला मिळाली. यात ती एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
तिच्यासोबत अभिनेता संजय बोरकरही पोलिसाच्या भूमिकेत पहायला मिळाला होता. पहिल्यांदाच मीराने पोलिसाची भूमिका साकारली आहे.
याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे.
या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.'
'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे