PICS : ‘दगडू’ची प्राजू हिचं का रे भाऊ? केतकी माटेगावकरचे फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:05 PM2022-04-27T16:05:47+5:302022-04-27T16:16:50+5:30

Ketaki Mategaonkar PICS : ‘टाईमपास’ या चित्रपटातील दगडूची प्राजू आताश: इतकी बदलली आहे की तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्याबद्दल.

‘टाईमपास’ या चित्रपटातील दगडूची प्राजू आताश: इतकी बदलली आहे की तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्याबद्दल. (All photos @ketakimategaonkar)

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच स्वत:चे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. पण सध्याचे तिचे फोटो पाहाल तर पाहातच राहाल.

होय, ‘टाईमपास’मधील सोज्वळ प्राजूने नुकतंच आपले काही एक हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

येलो क्रॉप टॉप आणि व्हाईट शॉर्ट्समध्ये केतकीने क्लासी पोझ दिल्या आहेत.अन्य फोटोत ती सिल्व्हर टॉप व पर्पल मिनी स्कर्टमध्ये दिसतेय.

केतकीचा हा लुक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडतोय.

कोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या शाळा या चित्रपटातून केतकीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं.

यानंतर काकस्पर्श, तानी या चित्रपटात ती झळकली. टाईमपास हा तिचा चित्रपट सर्वाधिक गाजला.

अभिनेत्रीसोबतच केतकी एक उत्तम गायिकादेखील आहे. सौंदर्य, अभिनय आणि गायकी यामुळे तिनं मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय.