वय? ते काय असतं...! मराठमोळ्या छाया कदम यांचा IIFA सोहळ्यासाठी स्टायलिश लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:08 IST2025-03-16T12:52:26+5:302025-03-16T13:08:00+5:30
छाया कदम कॅप्शनमध्ये म्हणतात...

अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) मराठीसोबतच आता हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय झाली आहे. इतकंच नाही तर तिने एका सिनेमासाठी कान्स फेस्टिवलमध्येही हजेरी लावली.
'सैराट', 'न्यूड' यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये दिसल्यानंतर छाया कदमने हिंदीतही आपली वेगळी ओळख बनवली आहे. 'गंगूबाई काठियावाडी', 'लापता लेडीज','मडगांव एक्सप्रेस' यासारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
छाया कदम यांच्या All we imagine as light या सिनेमाचं स्क्रीनिंग थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालं. या सोहळ्याला मराठमोळ्या छाया कदम यांनी हजेरी लावली आणि मराठी लोकांची मान अभिमानाने उंचावली.
छाया कदम सध्या त्यांच्या फॅशनमुळेही चर्चेत असतात. गेल्या काही दिवसात त्यांच्या स्टायलिश फोटोशूटने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. नुकतंच जयपूर येथे झालेल्या आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यासाठी छाया कदम यांनी हजेरी लावली.
डीप नेक, हाय स्लीट, पफ स्लीव्ह्ज रेड गाऊनमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. हा लूक त्यांना शोभून दिसतोय. नुकतेच त्यांनी या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि कातील पोज देऊन त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. 'वय हा फक्त आखडा आहे. जे आता आहे ते जगून घेऊ, बाकी पुढचे पुढे पाहू' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
छाया कदम यांच्या अभिनय कौशल्याला तर तोडच नाहीए. पण या वयातही फॅशनबाबतीत त्यांचा दांडगा उत्साह वाखणण्याजोगा आहे.
त्यांच्या या फोटोशूटवर प्रियदर्शिनी इंदलकर, तेजश्री प्रधानसह काही कलाकारांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.