"लिंबू कलरची साडी" नेसणाऱ्या अश्विनी भावे आजही दिसतात तितक्याच सुंदर; लग्नानंतर परदेशात झाल्या स्थायिक, आता काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 16:53 IST2026-02-21T16:48:08+5:302026-02-21T16:53:32+5:30

वयाची पन्नाशी ओलांडली तरी अश्विनी भावे या अजूनही तशाच दिसतात. त्यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही.

'अशी ही बनवाबनवी' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातील सगळ्याच पात्रांनी चाहत्यांना वेड लावलं होतं.

या सिनेमातील लिंबू कलरची साडी फारच लोकप्रिय झाली. या सिनेमात लिंबू कलरची साडी नेसणाऱ्या माधुरीची भूमिका अभिनेत्री अश्विनी भावेंनी साकारली होती.

अश्विनी भावे या मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री. कित्येक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.

'अशी ही बनवाबनवी', 'शाब्बास सुनबाई', 'हळद रुसली कुंकू हसलं', 'घोळात घोळ', 'एक रात्र मंतरलेली', 'मायेची सावली', 'सरकारनामा', 'धडाकेबाज' हे त्यांचे गाजलेले सिनेमे.

'कायदा कानून', 'परंपरा', 'जखमी दिल', 'वापसी साजन की', 'भैरवी', 'युगपुरुष' या हिंदी सिनेमांमध्येही अश्विनी भावे दिसल्या होत्या.

करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी किशोर बोपार्डीकर यांच्याशी लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर अश्विनी भावे या परदेशात स्थायिक झाल्या आहेत.

परदेशातील व्हिडीओ अश्विनी भावे त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसतात. परदेशात राहत असल्या तरी अश्विनी या चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असतात.

वयाची पन्नाशी ओलांडली तरी अश्विनी भावे या अजूनही तशाच दिसतात. त्यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही.

परदेशात स्थायिक झालेल्या अश्विनी अजूनही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अलिकडेच त्या 'गुलाबी' आणि 'घरत गणपती' या सिनेमांमध्ये दिसल्या होत्या.