घारे बोलके डोळे, गोरीपान..,९० च्या दशकातील अभिनेत्री आता कशी दिसते? 'या' क्षेत्रात करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:42 IST2025-08-01T15:13:26+5:302025-08-01T15:42:41+5:30
अभिनेत्रीच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच, ओळखलंत का?

८० आणि ९० च्या दशकातली ही देखणी अभिनेत्री आठवतेय? घारे बोलके डोळे, गोरी पान आणि तिच्या नृत्याची स्तुती तर करावी तितकी कमीच आहे.
अभिनेत्रीने मराठी, हिंदी आणि ओडिया सिनेमांमध्येही काम केलं. मराठीत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. तर हिंदीत राज बब्बर, जॅकी श्रॉफ यांच्यासोबत त्या दिसल्या आहेत.
'निवडुंग',' रंगत संगत, एका पेक्षा एक, अनपेक्षित, यांसारख्या मराठी चित्रपटात तर 'मर्दानगी', बात है प्यार की, आग से खेलेंगे, 'स्त्री' यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.
यासोबतच त्यांनी 'बोगामुल' या तामिळ सिनेमात तर 'सुना चंदेई' या ओडिया चित्रपटात काम केले आहे.
अशा या अभिनेत्री आहेत अर्चना जोगळेकर(Archana Joglekar). करिअरमध्ये यश मिळत असतानाच १९९९ साली त्यांनी शास्त्रज्ञ निर्मल मुळ्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर त्या कायमच्या अमेरिकेतच स्थायिक झाल्या. नंतर त्या काही मोजक्याच सिनेमांमध्ये दिसल्या. आजही अर्चना ६२ वर्षांच्या असून अगदी तशाच सुंदर आणि फीट आहेत.
अर्चना जोगळेकर कथक नृ्त्यात पारंगत आहेत. अमेरिकेत त्यांनी अर्चना आर्ट्स डान्स स्कुल सुरु केलं आहे. इथे त्या कथकचे प्रशिक्षण देतात. याचे फोटो व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
अर्चना जोगळेकर आणि निर्मल यांना ध्रुव हा मुलगा आहे. आईवडिलांसारखाच तोही कमालीचा हुशार आहे. तो टेनिस प्लेयर आहे.