Friendship Day 2022 : सई ताम्हणकर ते अमृता खानविलकर! मराठी कलाविश्वातील हे दिग्गज कलाकार आहेत एकमेकांचे बेस्टफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:00 AM2022-08-07T11:00:00+5:302022-08-07T11:00:00+5:30

Friendship day 2022: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्रांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील बेस्टफ्रेंडच्या जोड्या कोणत्या ते पाहुयात.

सध्या देशात मैत्रीचा दिवस अर्थात फ्रेंडशीप डे साजरा केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्रांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील बेस्टफ्रेंडच्या जोड्या कोणत्या ते पाहुयात.

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट - वजनदार या चित्रपटात झळकलेल्या या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असल्या या अभिनेत्री कायम एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे - मुंबई पुणे मुंबई या चित्रपटापासून अनेक चित्रपटांमध्ये एकत्र झळकलेली जोडी म्हणजे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे. या दोघांचं जसं ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळतं. तसंच ऑफस्क्रीनदेखील आहे.

भूषण प्रधान, वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत- मराठी कलाविश्वातील तिकडी म्हणून या तिघांकडे पाहिलं जातं. हे तिघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर ते एकमेकांसोबत शेअर करत असलेल्या फोटो, व्हिडीओवरुन हे दिसून येतं.

सिद्धार्थ चांदेकर आणि रोहित राऊत - सिद्धार्थ चांदेकर, रोहित राऊत, जुईली आणि मिताली मयेकर हे चौघ एकमेकांचे चांगले मित्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्यातील मैत्री कायम आहे.

ऋतुजा बागवे आणि अश्विनी कासार - ऋतुजा बागवे आणि अश्विनी कासार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या दोघी एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.

ऋतुजा बागवे आणि अश्विनी कासार - ऋतुजा बागवे आणि अश्विनी कासार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या दोघी एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.

अमृता खानविलकर आणि सोनाली खरे - मराठी कलाविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये या दोघींचा आवर्जुन उल्लेख केला जातो. या दोघी एकमेकींच्या बेस्टफ्रेंड असून कायम एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.

क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे - गेल्या कित्येक वर्षांपासून या दोघींची मैत्री कायम आहे. सोशल मीडियावरही या एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.