मराठी अभिनेत्रीचा 'रॉयल कारभार'! मुंबई, गोवा सोडा, थेट दुबईत घेतलं आलिशान घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:08 IST2023-04-26T10:22:53+5:302023-04-26T11:08:01+5:30
मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत मिळून काही दिवसांपूर्वीच दुबईतही घर घेतले

बिग बॉस 15 ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आगामी मराठी सिनेमा 'स्कुल, कॉलेज आणि लाइफ' मुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टी निर्मित हा पहिला मराठी चित्रपट आहेच. बिग बॉसच्या विजेतेपदानंतर तेजस्वीचं नशीबच पालटलं आहे.

एकता कपूरच्या'नागिन' मालिकेमुळे तेजस्वीला विशेष प्रसिद्धी मिळाली. तर बिग बॉसनंतर तिच्या चाहतावर्ग आणखी वाढला. टीव्हीच्या दुनियेत तर तेजस्वीचा दबदबा आहेच आता ती मोठ्या पडद्यावरही नशीब आजमावत आहे.

दुसरीकडे तेजस्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत असते. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत.दोघांची भेट बिग बॉसमध्येच झाली. यानंतर त्यांनी रोमँटिक अल्बम केला. दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु असते. दोघंही लवकरच लग्नबंधनातही अडकतील अशी चर्चा आहे.

तेजस्वी प्रकाशचं मुंबईत एक घर आहे जिथे गेल्या 25 वर्षांपासून राहत आहे. तिच्या मुंबईच्या घराचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याशिवाय तेजस्वीचं गोव्यातही एक घर आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोव्यात घर खरेदी केलं. त्यावेळी तिने ही गूडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती.

इतकंच नाही तर तेजस्वीने बॉयफ्रेंड करणसोबत मिळून थेट दुबईत घर घेतलं आहे. घराचे इंटिरियर गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट थिममध्ये असून खूपच क्लासी आहे. घरात इनडोअर पूलही आहे.

तीन घरांशिवाय तेजस्वीकडे लग्झरी कारही आहेत. तिच्याजवळ एक Audi Q4 ही महागडी कार आहे. तिने ही कार बिग बॉस 14 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर खरेदी केली होती. या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी एक महागडी कार आहे.

तेजस्वी एकता कपूरच्या प्रसिद्ध 'नागिन' शो मध्ये मुख्य नायिका आहे. यातील एका एपिसोडसाठी तिने तब्बल 6 लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.

तेजस्वीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्रामवरील एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 15 लाख रुपये घेते.

















