Amruta Subhash : 'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे

By देवेंद्र जाधव | Updated: June 18, 2025 13:05 IST2025-06-18T12:28:02+5:302025-06-18T13:05:24+5:30

Amruta Subhash : सध्या सर्वत्र 'जारण' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्ये काम केलंय.

अमृता सुभाषचा जारण हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमामुळे मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष चांगलीच चर्चेत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की अमृता सुभाषचा पतीही लोकप्रिय अभिनेता आहे.

अमृता सुभाषच्या (Amruta Subhash) पतीचं नाव आहे संदेश कुलकर्णी. संदेश आणि अमृता यांचं लव्ह मॅरेज आहे. संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ आहे.

संदेश यांनी अनेक मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. कॉफी आणि बरंच काही सिनेमात संदेशने साकारलेली कॉफी शॉपच्या मालकाची भूमिका चांगलीच गाजली होती

संदेश यांनी मसाला, कॉफी आणि बरंच काही, सायकल, मासा यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. संदेश यांनी अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्येही चांगलंच काम केलंय.

सेक्रेड गेम्स, बँक चोर, रुख, मुंबई डायरीज २६/ ११ यांसारख्या वेबसीरिज आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. संदेश यांच्या अभिनयाचं खूप कौतुक होतं

संदेश हे उत्कृष्ट लेखक असून त्यांनी लिहिलेलं असेन मी, नसेन मी हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरु आहे. या नाटकात अमृता सुभाष प्रमुख भूमिकेत आहे.

संदेश आणि अमृता यांनी कायमच एकमेकांच्या करिअरला सपोर्ट केलाय. आशयघन सिनेमात काम करणारी आणि संवेदनशील जोडी म्हणून संदेश-अमृताकडे पाहिलं जातं.