"करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर...", बोल्ड सीन करण्याबद्दल सई ताम्हणकर स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:05 IST2025-09-20T10:56:57+5:302025-09-20T11:05:27+5:30

Saie Tamhankar: सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मूळची सांगलीची आहे. तिने २००८ मध्ये 'सनई चौघडे' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिने 'ब्लॅक अँड व्हाइट' या हिंदी चित्रपटातही काम केले. तिने मराठी, हिंदी, तमीळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'दुनियादारी' आणि 'हंटर' यांसारख्या चित्रपटांमुळे तिला विशेष ओळख मिळाली. ती 'नो एन्ट्री-पुढे धोका आहे' या मराठी चित्रपटातील बिकिनी सीनमुळे देखील चर्चेत होती.

सई ताम्हणकर तिच्या 'नो एन्ट्री-पुढे धोका आहे' या चित्रपटातील बिकिनी सीनमुळे चर्चेत आली होती. अलीकडेच एका मुलाखतीत तिने या बिकिनी सीनबद्दल आपलं मत स्पष्ट केलं.

सईने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "हा सीन माझ्या चाहत्यांसाठी धक्कादायक असला तरी, माझ्या जागी दुसरी कोणीही असती, तर लोकांनी तिलाही स्वीकारलं असतं, जसं त्यांनी मला स्वीकारलं."

ती पुढे म्हणाली, "एखादी मुलगी स्विमिंग करत असताना स्विमसूट घालणं माझ्यासाठी खूप सामान्य होतं. पण लोकांसाठी तो एक बोल्ड सीन होता. तो केवळ माझ्या कामाचा एक भाग होता, आणि ही मर्यादा ओलांडून पुढे जाणं माझ्यासाठी गरजेचं होतं."

तिच्या 'हंटर' चित्रपटातील बोल्ड भूमिकेबद्दल आणि किसिंग सीनबद्दल बोलताना सई म्हणाली, "जर तुम्ही 'लोक काय म्हणतील?' असा विचार करणार असाल, तर अभिनेत्री म्हणून काम करणं शक्य नाही."

"तुम्हाला ते स्वीकारायला हवं. तो सीन चित्रपटाच्या शूटिंगनंतर एक वर्षाने शूट झाला होता, त्यामुळे तो माझ्यासाठी एक बोल्ड सीन नव्हता, तर माझ्या कामाचा भाग होता.", असे सई म्हणाली.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं असेल तर सई ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

सई ताम्हणकर शेवटची गुलकंद, ग्राउंड झिरो या सिनेमात झळकली.