आठवीत असताना प्रेमात पडलेली हृता, म्हणाली- "त्यानेच मला प्रपोज केलं, पण फोनवर बोलताना आईने पकडलं अन् मग..."
By कोमल खांबे | Updated: September 9, 2025 14:01 IST2025-09-09T13:38:49+5:302025-09-09T14:01:31+5:30
शाळेत असताना मुलाने प्रपोज केलं, फोनवर बोलताना आईने पकडलं अन्...; हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा

हृता दुर्गुळे ही महाराष्ट्राची क्रश आहे. आरपार या सिनेमातून हृता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात हृतासोबत ललित प्रभाकरही दिसणार आहे.
एक वेगळी लव्हस्टोरी आरपारमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हृताने तिची पहिली वहिली लव्हस्टोरी सांगितली.
आठवीत असताना हृताला एका मुलाने प्रपोज केलं होतं. पण, फोनवर बोलताना अभिनेत्रीला आईने पकडलं, असं हृताने जस्ट नील थिंग्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
हृता म्हणाली, "मी आठवीत होते. मला एका मुलाने प्रपोज केलं होतं".
"मी आईच्या फोनवरुन त्याच्याशी बोलायचे. आणि हे आईला कळेल हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे मी पकडले गेले होते".
"२-३ महिन्यांचंच आमचं रिलेशनशिप होतं. तेव्हा प्रेमाची व्याख्याच माहित नव्हती. पण, पहिलं प्रेम तेच होतं".
"तो माझ्या शाळेतला नव्हता. म्युच्युअल फ्रेंडमधून आमची ओळख झाली होती. मी शाळेतल्या मुलांना डेट नाही करायचे", असंही तिने सांगितलं.