कुणी नेसली नववारी साडी, तर कुणी केला नथीचा नखरा, पारंपारिक वेशात मराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:27 IST2022-04-02T17:20:50+5:302022-04-02T17:27:04+5:30
GudiPadva: गुढीपाडव्याला मराठी कलाकारांचा अनोखा थाट पाहायला मिळाला.

सोनाली कुलकर्णीने नववारी साडीतील फोटो शेअर करून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने काठपदरी साडी, नाकात नथ, गळ्यात हार घालून गुढीपाडवा साजरा केला आणि चाहत्यांना शुभेच्छादेखील दिल्या.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने काठापदऱ्याच्या साडीवर सिल्वर ज्वेलरी घालून फोटोशूट केले आणि चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
रिंकू राजगुरूने लाल रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती वेगवेगळ्या पोझमध्ये दिसते आहे.
मीराने देखील साडीत फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सायली संजीव नेहमी साडीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान पुन्हा एकदा तिने साडीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.