स्टार असूनही रिंकू राहते साध्याशा घरात; पाहा तिच्या अकलूजच्या घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 15:16 IST2023-11-22T15:10:52+5:302023-11-22T15:16:19+5:30

Rinku rajguru: घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाडं आहेत.

सैराट या सिनेमातून तुफान लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. आज रिंकूचं नाव प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जातं.

सैराटनंतर रिंकूने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. लवकरच ती झिम्मा २ या सिनेमामध्ये दिसणार आहे. त्यामुळे ती चर्चेत येत आहे.

यश आणि प्रसिद्धी उपभोगणारी रिंकू खऱ्या आयुष्यात प्रचंड साधी आहे. आजही ती अत्यंत साधेपणाने मध्यमवर्गीय जीवन जगते. त्यामुळेच तिचं अकलूजमधील घर कसं आहे ते पाहुयात.

अकलूजमध्ये रिंकू तिच्या आई-वडील, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत रिंकू राहते. अकलूजच्या संग्राम नगर येथे रिंकूचे घर आहे.

रिंकूचे आई-वडील दोघंही शिक्षक आहेत. रिंकूच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वीच संग्राम नगर येथे मोठा बंगला बांधला.

संग्रामनगरमध्ये राहण्यापूर्वी रिंकू राऊत नगरमध्ये राहत होती. रिंकू सहा वर्षांची असताना तिच्या वडिलांनी संग्राम नगरमध्ये नवीन घर बांधलं.

त्यांचे हे घर दुमजली आहे. वरती आणि खाली चार-चार खोल्या आहेत.

घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाडं आहेत.

रिंकूला चित्रकलेची आवड आहे घराच्या भिंतींवर रिंकूने स्वतः पेंट केलेले फोटो लावल्याचे पाहायला मिळतंय.

रिंकू बऱ्याचदा त्यांच्या घराच्या टेरेसवर तिचं फोटोशूट करत असते.

रिंकू फावल्यावेळात घरातल्यांसाठी स्वयंपाकही करते.

रिंकूच्या घरचं किचन हे अगदी साध्या पद्धतीचं आहे. तिथे कुठेही मॉर्डन किचन वा मॉड्युलर किचन वगैरे नाही.