'फॅण्ड्री'तल्या शालूला आता ओळखणं झालंय कठीण, दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:00 AM2022-07-16T07:00:00+5:302022-07-16T07:00:00+5:30

Rajeshwari Kharat: नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.

'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शालूची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्यांनं आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते.

आता राजेश्वरी खरातमध्ये खूप मोठा बदल झाला आहे.

तिचा बदललेला लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. ते तिच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

राजेश्वरी खरात दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे.

राजेश्वरी खरातच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली आहे.

लवकरच राजेश्वरी खरात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ती पुणे टू गोवा या चित्रपटात झळकणार आहे.

पुणे टू गोवा चित्रपटातील राजेश्वरीच्या भूमिकेबद्दल अद्याप काही समजलेले नाही. मात्र तिचे चाहते हिंदीच्या रुपेरी पडद्यावर तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.