ड्रिमगर्ल..!! मानसीचं आयफिल टॉवरसमोर ग्लॅमरस फोटोशूट, पॅरिसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:51 PM2024-02-05T13:51:32+5:302024-02-05T14:00:07+5:30

Manasi Naik : मानसी नाईक हिने नुकताच तिचा ३७वा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. तिने तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री मानसी नाईक वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या विधानांमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे.

मानसी नाईक हिने नुकताच तिचा ३७वा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. तिने तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर पॅरिसमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

या फोटोत मानसी नाईक हिने व्हाईट रंगाचं ब्रालेट आणि पॅण्ट घातली आहे. त्यावर तिने लाल रंगाचं जॅकेट परिधान केले आहे.

यात ती आयफिल टॉवरसमोर एकापेक्षा एक हटके पोझ देताना दिसते आहे.

मानसी नाईकने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, शैम्पेन विशेज, पॅरिस ड्रिम्स.

मानसी नाईक या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

मानसी नाईकचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

मानसी नाईक बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.