श्रेयस तळपदेसोबत असलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आता तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 07:00 AM2023-07-11T07:00:00+5:302023-07-11T07:00:12+5:30

मराठमोळी ही अभिनेत्री सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

श्रेयस तळपदेसोबत या फोटोत असलेली अभिनेत्री आठवते ना. ही अभिनेत्री म्हणजे संज्योत हर्डीकर.

संज्योत हर्डीकर हिने आभाळमाया या मालिकेतून आकांक्षाचे पात्र साकारले होते. या मालिकेत तिने श्रेयस सोबत काम केले होते.

त्यानंतर २००४ सालच्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटात दोघांना एकत्रित काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. या चित्रपटात दोघेही नायक नायिकेच्या भूमिकेत झळकले.

२०१५ साली संज्योतने श्रेयस साठी एक पोस्ट लिहिली होती. २०१५ नंतर आजही श्रेयस तेवढाच तरुण दिसतो, एवढी वर्षे झाली पण माझं त्याच्याबद्दल असलेलं मत अजूनही तसंच आहे असे संज्योत म्हणते. या पोस्टमधून तिने श्रेयसच्या तारुण्याचे कौतुक केले होते.

संज्योत हर्डीकर सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

संज्योत हर्डिकरमध्ये आता खूप बदल झाला असून आता तिला ओळखणं फार कठीण झाले आहे.

संज्योत हर्डीकर ही दिवंगत अभिनेते जयराम हर्डीकर यांची लेक आहे.

जयराम हर्डीकर यांनी सिंहासन, सर्वसाक्षी अशा चित्रपटातून काम केले होते. ‘मंतरलेलं चैत्रवेल’ या नाटकाच्या दौऱ्यावरून परत येत असताना ५ एप्रिल १९८० रोजी त्यांच्या बसला अपघात झाला. अपघातात बसने पेट घेतला आणि जयराम हर्डीकर सह शांता जोग आणि अन्य कलाकारांचे त्यात निधन झाले होते.