फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत? मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री; आईवडीलही सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:57 IST2026-04-10T12:49:28+5:302026-04-10T12:57:43+5:30

घरातूनच मिळाला अभिनयाचा वारसा, आज गाजवतेय मराठी फिल्म इंडस्ट्री; आईवडीलच नाही तर आजीही होती प्रसिद्ध अभिनेत्री

फोटोत आईसोबत उभी असलेली ही चिमुकली आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐवंढच नाही तर तिची आईही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात.

मराठी सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. ही अभिनेत्रीही त्यापैकीच एक आहे.

ही आहे अभिनेत्री क्षिती जोग. प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग आणि अभिनेत्री उज्वला जोग यांची ती कन्या आहे. तर दिग्गज अभिनेत्री शांता जोग यांची ती नात आहे. त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू क्षितीला घरातूनच मिळालं.

क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून', 'वादळवाट अशा मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकेतही ती झळकली.

क्षितीने २०१२ साली अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेशी लग्न करुन संसार थाटला.. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. तसंच ही जोडी आज मराठी इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत आहे.