'देऊळ बंद'मधली गश्मीरची मुलगी आठवते का? १० वर्षांत इतकी बदलली की आता ओळखूच येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:21 IST2026-03-25T13:17:25+5:302026-03-25T13:21:22+5:30

'देऊळ बंद' सिनेमात गश्मीरच्या मुलीची भूमिका बालकलाकार आर्या घारे हिने साकारली होती.

२०१५ साली प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद' सिनेमा प्रचंड गाजला. स्वामी समर्थ प्रचिती आणि भक्तीवर हा सिनेमा आधारित होता.

या सिनेमात गश्मीर महाजनीची मुख्य भूमिका होती. शास्त्रज्ञ असलेला गश्मीर त्याच्या कुटुंबासह भारतात एका प्रोजेक्टसाठी आल्याचं दाखवण्यात आलं होतं.

'देऊळ बंद' सिनेमात गश्मीरच्या मुलीची भूमिका बालकलाकार आर्या घारे हिने साकारली होती.

या सिनेमातील तिची भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. पण आता आर्यामध्ये खूपच बदल झाला आहे.

१० वर्षांनंतर आता आर्याला ओळखणंही कठीण झालं आहे. आर्याने बालकलाकार म्हणूनच इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.

अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मुक्ता बर्वेच्या बंदिशाळा सिनेमातही ती दिसली होती.

पोश्टर गर्ल या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. गाथा नवनाथांची या मालिकेतही आर्या झळकली आहे.

ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. आर्या तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

महेश मांजरेकर, गश्मीर महाजनी, मुक्ता बर्वे, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ झाडबुके, जितेंद्र जोशी अशा कलाकारांसोबत तिने काम केलं आहे.