Daughter's Day : सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केले लेकीचे बालपणीचे फोटो, तुम्ही पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 05:16 PM2021-09-26T17:16:55+5:302021-09-26T17:27:09+5:30

Daughter's Day 2021 : अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या लाडक्या लेकीला ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज ‘डॉटर्स डे’. जगभर हा दिवस साजरा केला जातोय. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनीही या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीला ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगावकर एक अभिनेत्री आहे. आई-बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत, ग्लॅमर इंडस्ट्रीत तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लेकीचं कौतुक असणारचं ना?

सुप्रिया यांनी आज डॉटर्स डे निमित्त श्रियाचे काही जुने फोटो शेअर करत आठवणी ताज्या केल्या आहेत.

श्रिया आणि सुप्रिया यांच्यात खूप खास नातं आहे. या मायलेकी कमी आणि मैत्रिणी जास्त आहेत. दोघीही सतत एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.

अलीकडे श्रिया शूटिंगनिमित्त गोव्यात होती. त्यामुळे सचिन आणि सुप्रिया श्रियासोबत वेळ घालवण्यासाठी गोवा ट्रिपवर गेले होते. या ट्रिपचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

श्रियाने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. यामध्ये तिचे सचिन पिळगांवकर हेच तिचे आॅनस्क्रीन बाबा होते.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे श्रियाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

यानंतर ती किंग खान शाहरुखच्या 'फॅन' या सिनेमातही झळकली होती. शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे.