छबीदार सुरत देखणी, नार गुलजार..! नेहा पेंडसेचा किलर लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:55 PM2024-03-22T14:55:11+5:302024-03-22T14:58:19+5:30

Nehha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत, या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच फोटो शेअर करत असते.

दरम्यान तिने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत, या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यात तिने यलो रंगाचा वन पीस परिधान केला आहे आणि केसांची वेेणी घातली आहे.

या फोटोशूटमध्ये नेहाने एका पेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

यात ती खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते आहे.

नेहा पेंडसेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

नेहा पेंडसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.