bigg boss फेम नेहा शितोळेचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता; बॉलिवूड चित्रपटांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:00 AM2022-06-28T07:00:00+5:302022-06-28T07:00:00+5:30

Neha shitole husband: यात सध्या नेहाच्या नवऱ्याविषयी चर्चा रंगली आहे. नेहाचा नवरादेखील तिच्याप्रमाणेच उत्तम अभिनेता आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नेहा शितोळे. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून नेहा घराघरात पोहोचली.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या नेहाचा बिग बॉसच्या घरात वेगळा अंदाज पाहायला मिळाला.

या शोमध्ये खिलाडू वृत्ती दाखवत तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यातील काही गोष्टीदेखील नेटकऱ्यांसोबत शेअर करते.

यात सध्या नेहाच्या नवऱ्याविषयी चर्चा रंगली आहे. नेहाचा नवरादेखील तिच्याप्रमाणेच उत्तम अभिनेता आहे.

नेहाच्या नवऱ्याचं नाव नचिकेत पूर्णपात्रे आहे असून तो मराठीसह हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे.

नचिकेतने कमीने, रॉकी हँडसम, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या हिंदी तसेच झिपऱ्या, अस्तू यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नेहानेदेखील रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध बेवसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली होती.