ऐश्वर्या नारकरच्या लेकाला कधी पाहिलंय? आईइतकाच दिसतो देखणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:48 AM2022-03-07T10:48:25+5:302022-03-07T10:53:12+5:30

Aishwarya narkar son: ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वय हा केवळ आकडा असतो हे ऐश्वर्या नारकर यांच्याकडे पाहिल्यावर कळतं.

वयाची ५० वर्ष पार केल्यानंतरही त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे त्यांचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून अनेक तरुण अभिनेत्री त्यांच्यासमोर फिक्या पडतात.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या नारकर कायम त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.

कधी साडीमध्ये तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटो शेअर करुन त्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

ऐश्वर्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पती अविनाश नारकरदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत.

अनेक चित्रपटांमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश या दोघांनीही एकत्र काम केलं आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.

ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं.

त्यांच्या मुलाचे नाव अमेय नारकर असून तो आई-वडिलांइतकाच दिसायला सुंदर आहे.

अमेय सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे फोटो शेअर करत असतो.

आईप्रमाणेच अमेयलादेखील फोटोशूटची आवड असल्याचं दिसून येतं.

नारकर कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो