"निवेदिता नसती तर भरकटलो असतो...", पत्नीबद्दल बोलताना अशोक सराफ झाले भावुक
By कोमल खांबे | Updated: July 20, 2025 08:05 IST2025-07-20T08:00:00+5:302025-07-20T08:05:01+5:30
निवेदिता सराफ यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ झाले भावुक, म्हणाले- "आमची भांडणं होतात, पण..."

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आदर्श जोडी. अगदी पावलोपावली त्यांनी एकमेकांची साथ दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी पत्नी निवेदिता सराफ यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याबद्दल बोलताना ते भावुक झाले.
"ती आहे म्हणून मी आहे. निवेदिता नसती तर भरकटलो असतो", असं अशोक सराफ अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "मला घराकडे बघावच लागत नाही. मी फक्त काम करतो. सगळा घरचा भार तिने घेतलाय. सगळं घरचं काम ती करते".
"माझे व्यवहार ती बघते. माझे फोन घेण्यापासून सगळं ती करते. मला काहीच करावं लागत नाही. ती एक अभिनेत्री असूनही काम करत असूनही अजूनही सगळं करतं".
"माझी सध्या एका बाजूला मान दुखते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, रोज रात्री ती मलम लावल्याशिवाय झोपायची नाही".
"ती माझ्यापेक्षा उशीरा घरी येते. मी ६-६.३० वाजता घरी येतो. ती ११ शिवाय घरी येत नाही. तुम्हाला माणूस काय आहे हे कळलं की नातं आणखी घट्ट होत जातं".
"तुम्ही माणूस काय आहे हे ओळखलं पाहिजे. माझ्या आयुष्यात मी अनेक गोष्टी केल्या. पण सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली केली असेल तर मी तिच्याशी लग्न केलं".
"आमची भांडणही होतात. पण, कितीही भडकलो तरी पहिली ती येते. आणखी काय पाहिजे??", असंही अशोक सराफ म्हणाले.