अमृता खानविलकरचं घर आतून कसं आहे? समोर आले Inside फोटो, एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:22 IST2025-04-07T18:18:07+5:302025-04-07T18:22:59+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. अमृता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे.
गेल्यावर्षी अमृतानं मुंबईत तिचं हक्काचं घर घेतलं होतं. आता नुकतंच तिनं आपल्या नव्या घराची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
अमृताचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. यावर तिने नव्या घराचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
अमृतानं या घराला 'एकम' असं नाव दिलंय. एक हा नंबर तिच्यासाठी खूप स्पेशल असल्याचं ती मानते.
अमृताचं हे घर २२व्या मजल्यावर आहे. २ बीएचके असलेलं हे घर तिनं अत्यंत सुंदररित्या सजवलं आहे.
या फोटोंमध्ये अमृताच्या घरातील मॉडर्न किचनचीही झलक दिसत आहे. किचनमध्ये आकर्षक फर्निचर करण्यात आलं आहे.
घरातील प्रत्येक एक वस्तू तिनं प्रेमानं खरेदी केली आहे.
अमृतानं खास नेमप्लेट घराबाहेर लावली आहे. ज्यावर अमृता खानविलकर या नावाखाली 'एकम' असं घराचं नाव देखील लिहिण्यात आलं आहे.
आपल्या मेहनतीच्या बळावर कमावलेल्या पैशातून तिनं हे घर घेतलं आहे. त्यामुळे हे खूप खास आहे.