मराठी कलाविश्वाची 'चंद्रमुखी' फिरतेय जपान देश! अमृता खानविलकरनं शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:21 IST2025-04-27T17:09:53+5:302025-04-27T17:21:04+5:30
अभिनेत्री सध्या जपान देशात फिरायला गेली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). सौंदर्याच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.
अमृताने मराठीसह हिंदीत काम केले आहे. विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
अमृता सध्या तिच्या जपान भ्रमंतीमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री सध्या जपान देशात फिरायला गेली आहे.
तिने जपानमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमृतानं जपानी लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
तिचे जपान भ्रमंतीचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अमृताच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
अमृताला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते.