हम तो उड गए! मराठी अभिनेत्रीची आईसोबत बाली ट्रीप, शेअर केले सुंदर Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:05 IST2025-11-06T13:52:23+5:302025-11-06T14:05:21+5:30
या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

अमृता खानविलकर मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. अमृता 'नॅचरल ब्युटी' म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

अमृताचा तिच्या आईसोबत खूप छान बाँड आहे. दोघींचे मजेशीर संभाषणं अमृता नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.

तर आईला घेऊन अमृता इंडोनेशियातील बाली येथे गेली आहे. मायलेकी मस्त ट्रिप एन्जॉय करत आहेत. तिथली प्रसिद्ध ठिकाणं बघत आहेत.

या ट्रीपमध्ये अमृताची फॅशन नेहमीप्रमाणेच ऑन पॉइंट आहे. तिने काही फोटो स्टोरीवर शेअर केले आहेत.

अमृताचा हा क्युट लूक प्रेमात पाडणारा आहे. केसांना व्हाईट रिबीन लावली आहे. तिच्या ड्रेसचा बॅक लूकही एकदम हॉट आहे.

बालीतील प्रसिद्ध स्विंग स्पॉटवर मायलेकींनी मस्त धमाल केलेली दिसत आहे. लोकल आऊटफिटमध्ये अमृता जणू परीच दिसत आहे. पिवळा रंग तिला शोभून दिसत आहे.

तसंच अमृताच्या आईनेही निळ्या रंगाचा आऊटफिट घातला आहे. खांद्याच्या ऑपरेशननंतर त्यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे असं अमृता सांगते.

















