'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क
By देवेंद्र जाधव | Updated: September 23, 2025 13:24 IST2025-09-23T12:20:56+5:302025-09-23T13:24:05+5:30
अशी ही बनवाबनवी सिनेमाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सिनेमासंंबंधी ही खास गोष्ट जाणून घेऊन तुम्हीही आनंदी व्हाल

१९८८ साली प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट आजही आवडीने पाहिला जातो. या चित्रपटाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत
जवळपास ३७ वर्षांनंतरही हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला की, लोक तो आवर्जून पाहतात. या चित्रपटातील प्रत्येक संवाद, प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
१९८८ च्या काळात 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाची तिकिटे ३ ते ५ रुपयांपर्यंत होती. या दरातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
३ रुपयांचं तिकिट असलेल्या 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाने त्या काळात तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला होता
सध्याच्या काळात ३ कोटींचा हा आकडा कमी वाटू शकतो, पण त्यावेळची महागाई आणि तिकिट दराचा विचार करता, ३ कोटींचा आकडा हा आज १०० कोटींहून अधिक मानला जातो.
'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट अनेक आठवडे 'हाउसफुल' होता. पुण्यातील प्रभात टॉकीजला चित्रपट ज्यांनी पाहिलाय ते अजूनही या चित्रपटाची खास आठवण जागवतात.
'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील 'लक्ष्मीकांत बेर्डेेंचा धनुष्यबाण', 'हा माझा बायको पार्वती', 'लिंबू कलरची साडी', '७० रुपयांची नोट', हे खास प्रसंग आजही सर्वांच्या लक्षात आहेत.