अप्सरेवरही मात करतायेत सोनालीच्या अदा; फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 11:59 IST2022-07-03T11:59:00+5:302022-07-03T11:59:00+5:30

Sonali kulkarni: मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने हिंदी, गुजराती, कन्नड, इटालियन, इंग्रजी सिनेमांतही तिने काम केलं आहे.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्याही मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर सोनालीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सोनालीने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची बऱ्याचदा चर्चा रंगत असते.

अलिकडेच सोनालीने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

सोनाली वरचेवर तिचे फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेले फोटो लक्षवेधी ठरत आहेत.

मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने हिंदी, गुजराती, कन्नड, इटालियन, इंग्रजी सिनेमांतही तिने काम केलं आहे.

अभिनय कौशल्याने सोनालीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत तिचं पहिलं लग्न झालं. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

त्यानंतर तिने नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत दुसरा विवाह केला आहे.