Photos: अप्सरेचा रॉयल अंदाज!! सोनाली कुलकर्णीने दहावार साडीत केलेल्या फोटोशूटची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:00 IST2022-04-27T12:48:45+5:302022-04-27T13:00:05+5:30

Sonalee kulkarni: सोनाली कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर सोनालीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सोनाली आज घराघरात अप्सरा या नावानेही ओळखली जाते. नटरंग (Natarang) या चित्रपटात अप्सरा आली या गाण्यावर डान्स केल्यानंतर ती याच नावाने लोकप्रिय झाली.

सोनाली कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच सोनालीने दहावार साडीत तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या फर्र असलेल्या साडीत तिचे हे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

सोनालीने या साडीत अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

सोनालीची ही नव्या पॅटर्नची साडी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न आऊटफिट परिधान करुन सोनाली नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.