गेटवे ऑफ इंडियाला सायली संजीवने केलं खास फोटोशूट, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:58 IST2025-01-10T17:22:33+5:302025-01-10T17:58:44+5:30

अभिनेत्री सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सायलीचं नवं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे (sayali sanjeev)

सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सायली संजीवने नुकतंच गेटवे ऑफ इंडियाजवळ खास फोटोशूट केलंय

सायली संजीवने खास ड्रेस परिधान करुन गेटवे ऑफ इंडियाजवळ फोटोशूट केलंय. सायलीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिलीय

सायली संजीव नुकतीच अभिनेत्री अभिज्ञा भावे, सायली साळुंखे यांच्यासोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला गेली होती.

सायली संजीव आपल्याला शेवटी नाना पाटेकर यांच्यासोबत 'ओले आले' सिनेमात दिसली होती. या सिनेमात नानांसोबत सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर झळकले होते.

सायली संजीवने 'काहे दिया परदेस' मालिकेतून तिच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर 'बस्ता', 'गोष्ट एका पैठणीची', 'झिम्मा २' या सिनेमांमधून सायलीने अभिनय केलाय

सायली संजीव रिअल लाइफमध्ये सिंगल आहे. सायलीचं आजवर कोणाही कलाकारासोबत नाव जोडलं गेलं नाहीये.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सायली संजीवने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. सायलीच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.