सुहास्य तुझे मनास मोही! आर्चीचा न्यू लूक पाहून चाहते पडले प्रेमात, Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:46 IST2024-02-12T13:27:58+5:302024-02-12T13:46:19+5:30

रिंकू राजगुरुचा नवीन लूक!

'सैराट'फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) क्रेझ आजही कायम आहे. ती प्रेक्षकांची आजही तितकीच लाडकी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या 'झिम्मा 2' सिनेमात तिने निर्मिती सावंत यांच्या सूनेची भूमिका साकारली.

'झिम्मा 2' मधील निर्मिती सावंत आणि तिच्यातील नोकझोक फारच मजेशीर होती. तिच्या भूमिकेने विशेष लक्ष वेधून घेतलं. सैराट नंतर तिचा हाच सिनेमा जोरदार चालला आहे.

रिंकू मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही अॅक्टिव्ह असते. ती अद्याप मोजक्याच प्रोजेक्ट्समध्ये दिसली आहे. मात्र तरी हिंदीतही तिची जोरदार फॅन फॉलोईंग आहे.

रिंकूने नुकतंच न्यू लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या लूकवर चाहते फिदा झालेत. शॉर्ट हेअरकट मध्ये ती आणखी सुंदर दिसत आहे.

या न्यू लूकमध्ये तिच्या दिलखुलास हास्याने तर बहार आणली आहे. तिच्या आनंदी राहण्याचं रहस्यच तिने यामधून उलगडलं आहे.

चाहत्यांनी एकावर एक कमेंट करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'किती छान दिसते गं कोणाची नजर लागायला नको' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

चाहत्यांनी एकावर एक कमेंट करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'किती छान दिसते गं कोणाची नजर लागायला नको' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.