रिंकूने शेअर केले मराठमोळ्या लूकमधील सिंपल फोटो; तिच्या सौंदर्यावरुन नेटकऱ्यांच्या नजरा काही हटेनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 15:37 IST2024-03-03T15:28:35+5:302024-03-03T15:37:52+5:30
Rinku rajguru: रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम तिचे भन्नाट फोटो शेअर करत असते.

उभ्या महाराष्ट्राला सैराट करुन सोडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमातून रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमा तिच्या पदरात पडले.
रिंकूने कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा, झिम्मा 2 या आणि अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.
अलिकडेच रिंकूने मराठमोळ्या साजशृंगारात तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं असून केसात छान गजरा माळला आहे.
रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाले आहेत.
रिंकूच्या गोड स्माइलने तिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.