'या' अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थामुळे आर्ची होते सैराट; रिंकूने सांगितला फेव्हरेट पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:06 IST2022-06-03T16:00:42+5:302022-06-03T16:06:04+5:30
Rinku rajguru:फिटनेस फ्रिक असेलली रिंकू नेमाने तिचा डाएट आणि वर्कआऊट फॉलो करते. मात्र, तरीदेखील एक मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ दिसला की ती त्यावर ताव मारते.

पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सैराट करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना याड लावणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या तिच्या नावाची चर्चा आहे.
सैराट, कागर, मेकअप या चित्रपटांसह रिंकू काही वेब सीरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग चांगलाच विस्तारला आहे.
रिंकू आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु, यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही रिंकू अत्यंत साधी राहते.
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेली रिंकू अभिनयासह तिच्या वर्कआऊटकडेही विशेष लक्ष देते.
फिटनेस फ्रिक असेलली रिंकू नेमाने तिचा डाएट आणि वर्कआऊट फॉलो करते. मात्र, तरीदेखील एक मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ दिसला की ती त्यावर ताव मारते.
एका मुलाखतीत रिंकूने तिचा डाएट प्लॅन आणि तिला आवडणारे पदार्थ सांगितले होते.
रिंकूला पुरणपोळी प्रचंड आवडत असून ती कोणत्याही वेळी पुरणाची पोळी सहज खाऊ शकते.
रिंकू फारशी फुडी नाही त्यामुळे जे असेल ते ती आवडीने खाते. मात्र, तिला तिच्या आईच्या हातचे पदार्थ खासकरुन आवडतात.