काय सांगता रिंकूचा आहे बॉयफ्रेंड? चाहत्याने नाव विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:06 IST2024-01-03T13:02:13+5:302024-01-03T13:06:43+5:30
Rinku rajguru: अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन घेतलं. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. उत्तम अभिनयाच्या जोरावर रिंकूने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.
'सैराट', 'कागर', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा', 'झुंड' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
अलिकडेच रिंकू 'झिम्मा 2' या सिनेमात झळकली. या सिनेमात तानिया ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात रहात असते.
अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले.
चाहत्यांनी विचारलेल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं तिने यावेळी दिली.
रिंकूच्या एका चाहत्याने तिला थेट तिच्या बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला. विशेष म्हणजे रिंकूने या प्रश्नाचं उत्तर दिलं.
'तुमच्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?' असा प्रश्न तिच्या चाहत्याने विचारला. त्यावर, 'बॉयफ्रेंडचं नाही तर नाव पण नाही', असं उत्तर रिंकूने दिलं.
दरम्यान, तिच्या या उत्तरामुळे रिंकू अजूनही सिंगल असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे.