Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे का ?'या प्रश्नानंतर आता प्राजक्ता माळी म्हणतेय, "नाही नाही संन्यास नाही घेतलाय.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 11:56 IST2023-02-23T07:00:00+5:302023-02-23T11:56:53+5:30
अलिकडेच प्राजक्ताचा श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनादरम्यानचा लग्नाबाबत प्रश्न विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावरील प्राजक्ता माळीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)

प्राजक्ता आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना फॉलो करते. नुकतेच तिने त्यांच्या बंगळुरु येथील आश्रमाला भेट दिली. तिथे ती श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनातही सहभागी झाली. (फोटो इन्स्टाग्राम)

यानंतर मुंबईत परत आल्यावर प्राजक्ताने साडीतले फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ''नाही नाही संन्यास नाही घेतलाय…हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले..'' (फोटो इन्स्टाग्राम)

प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

एका यूजरने लिहिले, तुम्ही जर संन्यास घेतला, तर आम्ही कस जगणार. आमचा श्वास म्हंजे तुमचे इन्स्टा पोस्ट आणि MHJ मधली प्राजक्ता. (फोटो इन्स्टाग्राम)

तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली, संन्यास नको घेऊ. (फोटो इन्स्टाग्राम)

प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सूत्रसंचालन करत आहे. तिचे सूत्रसंचालन, तिचे वेगवेगळे लुक्स नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. (फोटो इन्स्टाग्राम)

















