सिंगल स्ट्रिप ब्लाऊजमध्ये रिंकूने केलं फोटोशूट; साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 18:04 IST2022-06-12T18:01:28+5:302022-06-12T18:04:40+5:30
Rinku rajguru: रिंकू कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. उत्तम अभिनयाच्या जोरावर रिंकूने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी चित्रपटांमध्ये रिंकू झळकली आहे.
चित्रपटांसह रिंकू काही वेबसीरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.
रिंकू कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
रिंकूने अलिकडेच तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकूच्या साडीतील प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन कमेंट आणि लाइक्स करतात.
एक हुनर है चुप रहने का…इक ऐब है कह देने का…, असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने एका ब्रँडसाठी हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा रिंकू वेस्टर्नसह पारंपरिक कपड्यांमधील फोटोही शेअर करते.