किरण मानेंच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? अत्यंत साधेपणाने जगतात आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 12:54 PM2023-02-28T12:54:38+5:302023-02-28T13:00:24+5:30

Kiran mane: किरण माने यांची सासूरवाडी धामणेरला असून सासरच्या माणसांसोबत त्यांनी हुरडा पार्टी केली आहे.

अभिनयासह आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane).

समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर उघडपणे भाष्य करणारे किरण माने अलिकडेच बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg boss marathi 4) पर्वात सहभागी झाले होते.

कलाविश्वाप्रमाणेच किरण माने यांचा सोशल मीडियावरही तितकाच वावर आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसोबतच ते पर्सनल आयुष्यातील किस्सेही चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अलिकडेच किरण माने यांनी शेतातील हुरडा पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत असल्याचं दिसून येत आहे.

किरण माने यांची सासूरवाडी धामणेरला असून सासरच्या माणसांसोबत त्यांनी हुरडा पार्टी केली आहे.

या फोटोमध्ये किरण माने यांचं संपूर्ण कुटुंब दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे फोटो पाहून किरण माने व त्यांचे कुटुंबीय अत्यंत साधे असल्याचं नेटकरी म्हणत आहे.

हुरडा पार्टीची तयारी करताना किरण माने यांनी त्यांचा फोटो शेअर केला आहे.

किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मालिकांसह त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

ऑन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटांमध्ये ते झळकले असून माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.