कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:55 IST2024-11-27T12:33:07+5:302024-11-27T12:55:04+5:30
मराठी अभिनेत्याने उडवला लग्नाचा बार! कोकणात समुद्रकिनारी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

सिनेविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
मराठी अभिनेता अभिषेक गावकरही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसह लग्नगाठ बांधली आहे.
कोकणात समुद्रकिनारी अभिषेकने सोनालीसोबत सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचा अल्बम समोर आला आहे.
पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आयुष्यातील या खास क्षणासाठी अभिषेक आणि सोनालीने पारंपरिक पेहराव केला होता.
सोनालीने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर अभिषेकने धोतर घातलं होतं.
अभिषेक आणि सोनालीच्या लग्नातील काही खास क्षण कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
अभिषेकने 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सारं काही तिच्यासाठी मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
तर सोनाली एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते.
तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिचे अनेक रील व्हिडिओही व्हायरल होत असतात.