सरकारविरोधात खटला जिंकणारे मनोज कुमार हे एकमेव अभिनेता, काय आहे तो किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:32 IST2025-04-04T10:11:35+5:302025-04-04T10:32:09+5:30

मनोज कुमार हे भारत सरकारविरोधात खटला जिंकणारे ते एकमेव कलाकार

देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे (Manoj Kumar Dies At 87 In Mumbai) होते. मुंबईत कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मनोज कुमार यांच्या देशभक्ती विषयांपासून ते तत्कालीन सामाजिक-राजकीय चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. मनोज कुमार यांना लोकांनी प्रेमानं 'भारत कुमार' असं नाव दिलं होतं.

मनोज कुमार यांच्याशी काही किस्सेदेखील आहेत. असाच एक किस्सा आहे ज्याचा संबंध थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याशी आहे.

मनोज कुमार आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातील संबंध चांगले होते. पण, मनोज यांनी आणीबाणीचा (Emergency) उघडपणे विरोध केल्यानंतर परिस्थिती बिघडली.

आणीबाणीच्या काळात विरोध करणाऱ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होताच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. मनोज कुमारच्या यांच्याबाबतही असेच काहीसं घडलं.

मनोज कुमार यांचा 'दस नंबरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यावर बंदी घातली होती. यानंतर 'शोर' प्रदर्शित झाला तेव्हाही असेच काहीसे दिसून आले.

'शोर' चे दिग्दर्शक आणि निर्माता दोघेही मनोज कुमार होते. अशा परिस्थितीत, चित्रपटगृहांमध्ये बंदी घालल्यानंतर चित्रपट दूरदर्शनवर लगेच प्रदर्शित करण्यात आला.

ज्यामुळे चित्रपट थिएटरमध्ये कमाई करू शकला नाही आणि मनोज यांचं मोठं नुकसान झालं.अशा परिस्थितीत मनोज कुमार यांच्याकडे पर्याय उरला नाही आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

मनोज कुमार हे सरकारच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यांनी अनेक आठवडे न्यायालयाच्या फेऱ्या मारल्या. अखेर निकाल त्यांच्या बाजूने लागला.

यामुळेच मनोज कुमार हे असे अभिनेते आणि निर्माते होते, ज्यांनी थेट सरकारविरोधातील खटला जिंकला होता.