सानूचा इंडो-वस्टर्न लूक! रिना मधुकरचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:03 IST2022-05-23T15:01:00+5:302022-05-23T15:03:24+5:30

Reena Madhukar:रिना कधी वेस्टर्न, तर कधी पारंपरिक गेटअपमध्ये फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने इंडो-वेस्टर्न लूक करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सध्याच्या घडीला रिना मधुकर हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून रिना घराघरात पोहोचली.

मन उडू उडू झालं या मालिकेत रिना, सानूची भूमिका साकारत आहे. किंचितशी नकारात्मक छटा असलेल्या तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

कलाविश्वाप्रमाणेच रिना सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.

काही दिवसांपूर्वीच रिनाने अंडरवॉटर फोटोशूट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

रिना कधी वेस्टर्न, तर कधी पारंपरिक गेटअपमध्ये फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने इंडो-वेस्टर्न लूक करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पुण्यातून शिक्षण पूर्ण केलेल्या रिनाने लोकनृत्याचा अभ्यास केला आहे. त्यामुळे यापूर्वी तिने लोकनृत्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत.

अशाच एका कार्यक्रमात तिची आणि दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची भेट झाली. तिचं नृत्य पाहून त्यांनी तिची 'अजिंठा' या चित्रपटातील कमला हे मध्यवर्ती पात्र साकारण्यासाठी निवड केली.

या चित्रपटाच्या आधी तिनं 'क्या मस्त है लाइफ' या टीव्ही शो मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.

रिनाने आमिर खानच्या 'तलाश' या चित्रपटात आमिर खानच्या सहकाऱ्याची भूमिकाही साकारली आहे.

रिनाने 'एजंट राघव' या हिंदी मालिकेत फॉरेन्सिक डॉक्टर आरती मिस्त्रीची मध्यवर्ती भूमिकाही वठवली आहे.