'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मालदीव्समध्ये रोमँटिक अंदाज; नवऱ्याबरोबरचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:56 IST2024-01-01T16:48:17+5:302024-01-01T16:56:37+5:30
हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री मालदीव्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे चेतना भट.

चेतना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या ती नवऱ्यासोबत मालदीव्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

चेतनाने मालदीव्स व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चेतनाने पांढऱ्या रंगाचा वनपीस घालत फॅशन केली आहे.

नवऱ्याबरोबर चेतनाने रोमँटिक पोझ दिल्या आहेत. चेतनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

चेतनाच्या या फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. गायिका वैशाली सामंतने केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे.

"काय खरं नाई मालदीव्सचं" अशी कमेंट वैशाली सामंतने चेतनाच्या फोटोंवर केली आहे.

चेतनाप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वातच काम करतो. तिच्या नवऱ्याचं नाव मंदार चोळकर आहे.

मंदार हा प्रसिद्ध गीतकार आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने काम केलं आहे.

चेतनाही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी कलाविश्वात कार्यरत आहे. 'अलमोस्ट सफळ संपूर्ण' या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

















