‘लागिरं झालं जी’ची पुष्पा मामी नव्या फोटोंमुळे आली चर्चेत, आत्ताचे फोटो पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 17:58 IST2021-03-07T17:42:45+5:302021-03-07T17:58:24+5:30
झी मराठी या वाहिनीवरच्या ‘लागिरं झालं जी’ या गाजलेल्या मलिकेतील अज्या आणि शीतली तर तुम्हाला हमखास आठवतील. पण या मालिकेतील पुष्पा मामी तुम्हाला आठवतेय?

झी मराठी या वाहिनीवरच्या ‘लागिरं झालं जी’ या गाजलेल्या मलिकेतील अज्या आणि शीतली तर तुम्हाला हमखास आठवतील. पण या मालिकेतील पुष्पा मामी तुम्हाला आठवतेय?
आम्ही बोलतोय ते विद्या सावळेबद्दल. या मालिकेत विद्या सावळेने मामीची भूमिका साकारली होती. ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.
वर्षभर ही भूमिका साकारल्यानंतर अचानक निर्मात्या सोबत काहीतरी वाद झाल्याने त्यांनी मालिकेतून माघार घेतली होती. पण तोपर्यंत मामीचा चेहरा घराघरात पोहोचला होता.
ही मामी ख-या आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावरचे तिचे ताजे फोटो पाहिल्यानंतर क्षणभर तुम्हालाही विश्वास होणार नाही.
छोट्या पडद्यावर नेहमी साडीत दिसणा-या विद्याचा मॉडर्न अवतार पाहून चाहतेही अवाक् आहेत.
विद्या अभिनयामुळे चर्चेत असते अगदी तशीच तिच्या मॉडर्न लूकचीही चर्चा असते.
महाविद्यालयात असताना पासूनच 1996 पासून विद्याने अनेक नाटक व एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला.
काही चित्रपटांतही विद्याने काम केले आहे. सुपर्ब प्लान, जुगाड या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत.
‘लागिरं झालं जी’ मालिकेतून अचानक बाहेर पडलेल्या मामी काही महिन्याच्या विश्रांती नंतर कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘जीव झाला येडा पीसा’ या मालिकेत दिसल्या.