क्रिती सनॉननं भाडेतत्वावर घेतलं घर, अथिया अन् केएल राहुलची शेजारी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:56 IST2025-02-27T12:43:13+5:302025-02-27T12:56:19+5:30

क्रिती सनॉनने घर घेतले भाडेतत्त्वार, किती देणार भाडे?

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) ही लोकप्रिय अभिनेत्रीं एक आहे. क्रिती सनॉनची संपत्ती किती आहे हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच लागून असते.

खरंतर क्रिती सनॉनची संपत्ती ही कोट्यावधींमध्ये आहे. आलिबागमध्ये तिचं घर आहे. पण, मुंबईत तिनं अद्याप तिचं घर घेतलेलं नाही.

गेल्या काही वर्षांपासून क्रिती सनॉन भाडेतत्वावर घर घेते. याआधी तिनं अमिताभ बच्चन यांचा अंधेरी परिसरात डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला होता.

२०२३ मध्ये तिने हा फ्लॅट दोन वर्षांचा करार करत भाडेतत्वावर घेतला होता. आता अभिनेत्रीनं अमिताभ यांचा फ्लॅट सोडला असून नवीन घरात (Kriti Sanon Took A Luxurious Flat On Rent) राहण्यासाठी गेली आहे.

क्रिती सनॉन ही वांद्रे येथील बहुप्रतिक्षित संधू पॅलेसमध्ये राहायला गेली आहे. नव्या घरी कडक सुरक्षा व्यवस्थेसाठीही अभिनेत्रीनं पैसे मोजले आहेत.

इतकेच नाही तर दर महिन्याला ती लाखो रुपयांचे भाडे भरणार आहे. पूर्वी ओशिवरामधील अटलांटिस येथे राहात असताना अभिनेत्री अमिताभ बच्चन यांना महिन्याला १० लाख रुपये देत होती.

आता नव्या ठिकाणचं भाड अधिक आहे. viralbhayaniने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, या फ्लॅटसाठी अभिनेत्री क्रिती दर महिन्याला १७ लाख रुपये देणार आहे. याबाबतचा करारही झाल्याची माहिती आहे.

क्रिती सनॉन क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांची शेजारी झाली आहे.

क्रितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'तेरे इश्क में' (Tere Ishq Mein)सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती सुपरस्टार धनुषसोबत पाहायला मिळणार आहे.

तर तिच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर क्रिती ही कबीर बहियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर दोघे यंदा लग्नबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जात आहे.