सिनेइंडस्ट्रीतून गायब असणारी क्रांती रेडकर आहे यशस्वी बिझनेस वुमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:59 IST2021-10-27T17:46:12+5:302021-10-27T17:59:56+5:30

अभिनेत्री क्रांती रेडकर दोन ब्रॅण्ड्सची मालकीण आहे.

क्रांती रेडकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

क्रांती रेडकर हिने मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

क्रांती रेडकर ‘जत्रा’, ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

क्रांतीने २००३ मध्ये ‘गंगाजल’ चित्रपटात काम केले.

क्रांती रेडकरने काकण या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

क्रांती रेडकर हिने २०१७ साली समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले आहे.

क्रांती रेडकर हिने अगदी गुपचूप आणि साध्या पद्धतीने लग्न केले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरचा नवरा समीर वानखेडे हा अंमलीपदार्थ विरोधी पथकात (एनसीबी) कार्यरत आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे समीर वानखेडे सध्याा चर्चेत आले आहेत.

क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत.

क्रांतीचाही कपड्यांचा आणि ज्वेलरीचा व्यवसाय आहे.

क्रांतीच्या कपड्याच्या ब्रॅण्डचे नाव ‘झिया झायदा’ (ZiyaZyda) आहे तर क्रांतीने (KraKar) ज्वेलरी ब्रॅण्डसुद्धा लाँच केला आहे.