इतकं सोप्प नव्हतं राव! किरणसोबत लग्न करण्यासाठी आमिरला मोजावे लागले होते तब्बल 50 कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 02:16 PM2021-11-07T14:16:11+5:302021-11-07T14:23:43+5:30

Kiran Rao Birthday: लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर आमिर व किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच किरणशी लग्न करण्यासाठी आमिर खानला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

किरण राव आता आमिर खानची पत्नी राहिलेली नाही. काहीच महिन्यांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला.

किरण राव तशी गुणी दिग्दर्शिका आणि लेखिका. पण आमिर खान आयुष्यात आला आणि आमिरची पत्नी हीच तिची जणू ओळख बनली होती.

‘लगान’च्या सेटवर किरण आमिर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2005 मध्ये दोघांनीही लग्नगाठ बांधली.

लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर आमिर व किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच किरणशी लग्न करण्यासाठी आमिर खानला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

पण हे खरं आहे. होय, कारण किरणच्या प्रेमात पडला तेव्हा आमिर विवाहित होता. रिना दत्त त्याची पत्नी होती. रिनाला घटस्फोट दिल्याशिवाय किरणशी लग्न करणं शक्य नव्हतं.

रिनाला घटस्फोट देण्यासाठी आमिरला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते. आमिरने पोटगी म्हणून रिनाला 50 कोटी रुपये दिले होते.

रिनाला घटस्फोट दिल्यानंतर तीन वर्षांनंतर आमिर आणि किरणने लग्न केले होते.

करिअरच्या सुरुवातील किरण रावने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

Read in English