हॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 11:43 IST2020-12-02T11:31:19+5:302020-12-02T11:43:28+5:30
अभिनेत्री कश्मीरा शाहने हॉलिवूड फिल्म प्रोड्युसर ब्रेड लिसरमनसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकल नाही.

अभिनेत्री कश्मीरा शाह आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. कश्मीराचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. करीश्मा फिल्मी करिअरला सुद्धा आता दोन दशकांपेक्षा अधिक काळ झाला आहे. टीव्हीवरही ती चांगलीच पॉप्युलर आहे. आज ती तिचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. चला जाणून घेऊ तिच्या लव्ह लाइफबाबत...
अभिनेत्री कश्मीरा शाहने हॉलिवूड फिल्म प्रोड्युसर ब्रेड लिसरमनसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकल नाही. ६ वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करीश्माने पुन्हा सिनेमात येण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान तिची भेट कृष्णा अभिषेकसोबत झाली.
कश्मीरा शाह आणि कृष्णाची पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती. ते पप्पू पास हो गया सिनेमाचं शूटींग करत होते. त्यावेळी कश्मीरा पतीपासून वेगळी झालेली होती.
सुरूवातीपासूनच कृष्णाच्या मनात कश्मीराबाबत एक सॉफ्ट कॉर्नर होता. तो या गोष्टीने दु:खी होता की, कश्मीरा विवाहित आहे. पण जसं कृष्णाला समजलं की, आता कश्मीरा पतीपासून वेगळी झाली आहे तर त्याचा कश्मीरातील इंटरेस्ट वाढला.
कुणासाठीही वैवाहिक जीवनातून बाहेर येणं सोपं नसतं. या कठिण काळात कृष्णाने कश्मीराला भरपूर साथ दिली. यादरम्यान दोघांची जवळीक वाढली. इतकेच काय तर दोघांना याचं काहीच देणं-घेणं नव्हतं की दोघांमध्ये वयाचं भरपूर अंतर आहे. दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर आहे.
नंतर कृष्णा आणि कश्मीराने लग्न केलं. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. आज दोघेही इंडस्ट्रीतील फेमस जोडी आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कश्मीराने १९९७ मध्ये शाहरूख खानचा सिनेमा यस बॉसपासून सुरूवात केली होती. त्यानंतर ती बऱ्याच सिनेमात दिसली.
टीव्हीवर ती बिग बॉस सीझन १ ची भाग होती. या शोमधून ती ५१व्या दिवशी बाहेर पडली. त्यानंतर २००७ मध्ये नच बलियेमध्ये कृष्णासोबत दिसली होती.