दोन मुलांची आई अन् ११ वर्षांनी लहान, कोण आहे श्रीलीला? जिला कार्तिक आर्यन करतोय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:23 IST2025-03-13T17:07:17+5:302025-03-13T17:23:55+5:30
२३ वर्षीय श्रीलीला आहे दोन मुलांची, ११ वर्षांनी लहान आहे कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आला आहे. कार्तिक साऊथ अभिनेत्री श्रीलीलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आणि श्रीलीलाच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. कार्तिकच्या फॅमिली फंक्शनमध्येही ती दिसली होती. तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलं.
अभिनेत्याच्या आईनेच कार्तिकच्या डेटिंगबाबत हिंट दिली होती. त्यामुळे सध्या ते डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
श्रीलीला साऊथ अभिनेत्री आहे. तिने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे.
डॉक्टर होण्याआधीच श्रीलीलाने २०२१ मध्ये किस या सिनेमातून पदार्पण केलं होतं. ती एक भरतनाट्यम डान्सरही आहे.
श्रीलीलाची आईदेखील एक गायनॉकोलॉजिस्ट आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर श्रीलीला सुपरस्टार सुपरनेनी सुभाकर यांची मुलगी असल्याचं बोललं जात होतं.
मात्र पत्नीपासून घटस्फोटानंतर श्रीलीलाचा जन्म झाल्याने ती माझी मुलगी नसल्याचं अभिनेत्याने स्पष्ट केलं होतं.
२३ वर्षीय श्रीलीला कार्तिक आर्यनपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. याशिवाय ती दोन मुलांची आई आहे.
२०२२ मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलं गुरू आणि शोभिता यांना दत्तक घेत त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे.