लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीच्या योगा पोझची रंगलीय चर्चा, फोटो झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 15:30 IST2020-04-23T15:28:00+5:302020-04-23T15:30:02+5:30

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्नाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

करिश्मा तन्नाने तिचे योगा करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

करिश्मा तन्ना इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून ती तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर अपलोड करत असते.

करिश्मा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती फिट राहाण्यासाठी न चुकता व्यायाम करते.

करिश्माने बिकनीमध्ये अनेकवेळा फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे नावारूपाला आलेली करिश्मा नुकतीच खतरों के खिलाडीमध्ये झळकली होती.

करिश्माने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजू या चित्रपटात झळकली होती.

करिश्माला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.